औरंगाबाद - चेन स्नॅचिंग आणि पाकिटमारीच्या दुनियेतील शनी समजला जाणारा कुख्यात आरोपी शेख चांद हा ८ नोव्हेम्बर रोजी गुन्हेशाखेच्या तावडीतून पोलिसांच्या हातावर तुरी देत पोलीस आयुक्तालयातून पसार झाला होता. गुन्हेशाखा त्याला शोधण्यात अध्याप यशस्वी न झाल्याने आठवडा भरानंतरही "चांद कही खो गया" अशा खमंग चर्चा सुरू आहे.
गुन्हेगारी दुनियेत आपली छाप निर्माण करणाऱ्या चांद विरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत मात्र तो दाखल गुन्ह्यातील प्रकरणात न्यायालयात हजर होत नसल्याने त्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले होते.पोलिसांनी त्याला ८ नोव्हेंबर रोजी पकडल्या नंतर तो पोलीस आयुक्तालयातून ८ नोव्हेम्बर च्या सकाळी पसार झाला होता. क्रांतिचौक पोलीस ठाण्यात फरार झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेला आठवडा पूर्ण झाला असून अद्याप कुख्यत चांदला शोधन्यात क्रांतिचौक पोलिसांसह गुन्हेशाखेला यश आलेले नाही. त्यामुळे चांद कहीं खोगया अशा चर्चा सुरू आहे












